Bhosari News: भोसरीमधील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी 50 एमव्हीएचे दोन नवीन पॉवर ट्रॉन्सफॉर्मर बसवणार

एमपीसी न्यूज – भोसरी एमआयडीसीमधील उद्योगांसह भोसरी गाव, नाशिक रोड, दिघी या परिसरातील सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी महापारेषणच्या अतिउच्च दाब उपकेंद्रात प्रत्येकी 50 एमव्हीए क्षमतेचे अतिरिक्त दोन नवीन पॉवर ट्रॉन्सफॉर्मर बसविण्याचा प्रस्ताव मुख्यालयास पाठविण्यात येणार आहेत.

भोसरीमधील प्रामुख्याने औद्योगिक व इतर सर्व ग्राहकांना होणाऱ्या वीजपुरवठ्यात आणखी सुधारणा करण्यासाठी पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार (महावितरण) आणि राजेंद्र गायकवाड (महापारेषण) यांनी भोसरी येथील महापारेषणच्या अतिउच्चदाब उपकेंद्रासह इतर वीजयंत्रणेची संयुक्तपणे नुकतीच पाहणी केली. यावेळी अधीक्षक अभियंता सतीश राजदीप, सतीश गायकवाड व भोसरीचे कार्यकारी अभियंता उदय भोसले उपस्थित होते.

Chinchwad News: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक प्रकरणातील आरोपींना 14 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी

सेन्चुरी इन्का उपकेंद्रातील नवीन पॉवर ट्रॉन्सफॉर्मरमुळे भोसरी एमआयडीसीमधील उद्योगांसह भोसरी गाव, नाशिक रोड, दिघी या परिसरात दर्जेदार वीजपुरवठा होणार आहे. सध्या असलेल्या वीजवाहिन्यांची लांबी तसेच त्यावरील वीजभार कमी होणार आहे. परिणामी वीजपुरवठा देखील विनाव्यत्यय व योग्य दाबाने सुरळीत राहणार आहे. भोसरी विभाग कार्यालयाने यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी यावेळी दिले. तसेच भोसरी विभाग अंतर्गत भोसरी उपविभागामध्ये दिघी व इंद्रायणीनगरमध्ये तसेच आकुर्डी उपविभागामध्ये चिखली येथे नवीन शाखा कार्यालयांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव तयार करून तो मुख्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.