Nigdi : भाजीची गाडी लावण्यावरून दोन तरुणांना बेदम मारहाण

two-persons-were-severly-beaten-up-over-parking-of-the-vegetable-cart-in-nigdi

एमपीसी न्यूज – भाजीची गाडी लावण्यावरून सहा जणांनी मिळून दोन तरुणांना हातोडी, कोयता आणि पहारीने बेदम मारहाण केली. यामध्ये दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी (दि. 14) दुपारी चारच्या सुमारास चिकन चौकाजवळ, ओटास्कीम, निगडी येथे घडली.
सनी भाऊ मोरे (वय 35), दादा भाऊ मोरे (वय 32), लक्ष्मण भाऊ मोरे (वय 28), भोला भाऊ मोरे (वय 26), बलदेव सिंग टाक (वय 25), डॅनी टाक (वय 23, सर्व रा. ओटास्कीम निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी लखन कैलास सातव (वय 25, रा. ओटास्कीम निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी फिर्यादी लखन आणि त्यांचा मित्र निखील साठे हे दोघेजण बाळू जाधव यांच्या भाजीच्या हातगाड्याच्या बाजूला थांबले होते. त्यावेळी आरोपी सनी तिथे कोयता घेऊन आला आणि ‘इथे भाजीची गाडी का लावली आहे, मला लावायची आहे’ असे म्हणाला.
त्यावर फिर्यादी लखन यांनी ‘तुला काय अडचण आहे’, असा त्याला जाब विचारला. यावर लखन आणि सनी यांची बाचाबाची सुरू झाली. तेवढ्यात आरोपी दादा लोखंडी पहार, आरोपी बलदेवसिंग लोखंडी हातोडी घेऊन आले. त्यांच्यासोबत अन्य आरोपीही होते.
आरोपींनी लखन आणि निखिल या दोघांना शिवीगाळ करत मारहाण केली. आरोपी दादा याने लोखंडी पहार लखनच्या डोक्यात मारली. आरोपी बलदेवसिंग याने हातोडीने लखनच्या पायावर मारून जखमी केले. आरोपी सनी याने निखिलला कोयत्याने मारले. यामध्ये लखन आणि निखील गंभीर जखमी झाले आहेत. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87ab66d2ddbf2252',t:'MTcxNDE4NTE0NC4xMTgwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();