Vaccination News : पॉझिटिव्ह न्यूज ! भारतात पन्नास कोटी नागरिकांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस 

एमपीसी न्यूज – देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढला आहे. दररोज पन्नास ते साठ लाख नागरिकांना लस टोचण्यात येत आहे. लसीकरण मोहिमेत भारताने महत्वपूर्ण टप्पा पूर्ण केला असून, आत्तापर्यंत पन्नास कोटी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. 

केंद्रीय आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 50 कोटी 03 लाख 48 हजार 866 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. आज (शुक्रवारी) रात्री सात वाजेपर्यंत 43 लाख 29 हजार 673 जणांचे लसीकरण करण्यात आले.

देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 3 कोटी 10 लाख 15 हजार 844 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 97.36 टक्के एवढा आहे. देशात सध्या 4 लाख 14 हजार 159 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.