Vadgaon Maval news: प्रभाग क्रमांक सहा मधील विविध विकासकामांचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज – वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक सहामध्ये विविध विकास कामांचे नुकतेच भूमिपूजन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बाबुराव आप्पा वायकर व नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी उपनगराध्यक्षा पुजा वहिले, माजी उपसरपंच तुकाराम ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, चंद्रजित वाघमारे, शारदा ढोरे, पूनम जाधव, सुदेश गिरमे, विशाल वहिले, किसन वहिले, प्रविण ढोरे, अफताब सय्यद, मंगेश खैरे, गणेश ढोरे, तुषार वहिले, शंकर साकोरे, नितीन चव्हाण, खंडू जाधव, अ‍ॅड संदिप घोटकुले, शैलेश वहिले, कुलदिप पाळेकर, अतुल चव्हाण, बाबाजी शिंदे, गणेश गायकवाड, अनिस शेख, मुरलीधर दावभट, उदय अहिर, केदार बवरे आदी उपस्थित होते.

वडगाव नगरपंचायत नगरोत्थान योजनेतून प्रभाग क्रमांक सहामध्ये उपनगराध्यक्षा पुजा विशाल वहिले यांच्या विशेष प्रयत्नातून, आमदार सुनिल शेळके व जिल्हा परिषद कृषी सभापती बाबुराव वायकर यांच्या फंडातून विविध विकास कामे मंजूर झाली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पंचमुखी काॅलनीतील अंतर्गत बंदिस्त गटाराचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.