BNR-HDR-TOP-Mobile

Vadgaon Maval : वडगाव मावळ येथे रविवारी विविध विकासकामांचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत वडगाव नगरपंचायतीच्या विविध प्रभागांमधील विकासकामांचे भूमिपूजन कामगार व पुनर्वसन राज्यमंत्री बाळा भेगडे व खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम नगरपंचायतीच्या प्रांगणात उद्या, रविवारी (दि. 25) दुपारी चार वाजता होणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष राहुल ढोरे आणि मुख्याधिकारी सुवर्ण ओगले यांनी दिली.

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत नगरपंचायत अनुदान योजनेअंतर्गत वडगाव नगरपंचायतीच्या विविध प्रभागांमधील विकासकामांसाठी निधी मंजूर झाला आहे. यामध्ये रस्ते, अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण, बंदिस्त गटार योजना, जलवाहिन्या टाकणे या कामांचा समावेश आहे.

हा कार्यक्रम नगरपंचायतीच्या प्रांगणात उद्या, रविवारी (दि. २५) दुपारी चार वाजता होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री मदन बाफना तर प्रमुख पाहुणे म्हणून मावळ तालुका भाजप प्रभारी भास्कर म्हाळसकर, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, माजी उपसभापती गणेश ढोरे, मावळ तालुका काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, मावळा तालुका मनसे अध्यक्ष रुपेश म्हाळसकर तसेच सर्व पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like