Pimpri: महापालिकेने गणेशमूर्ती परवानगीच्या भूई भाड्यात केली सहापट वाढ

एक हजार रुपयांवरुन सहा हजार रुपये केले भाडे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आकारल्या जाणा-या गणेशमूर्ती परवानगीच्या भूईभाड्यात वाढ करण्यात आली आहे. एक हजार रुपयांवरुन सहा हजार रुपये करण्यात आले आहेत. प्रदूषण निर्मूलन शुल्काचे कारण देत तब्बल पाच हजार रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे गणेश मूर्ती विक्रेत्यांवर संक्रांत ओढवली आहे.

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशमूर्ती विक्रीसाठी विक्रेत्यांकडून शहरात तात्पुरत्या स्वरुपात स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. शहरातील विविध भागात दरवर्षी शेकडो स्टॉल्स उभारले जातात. महापालिकेकडून स्टॉल्सला परवानगी देताना भूईभाडे आकारले जाते. गतवर्षी एक हजार रुपये भूईभाडे अधिक जीएसटी (वस्तू व सेवा कर) असे परवाना शुल्क महापालिकेने आकारले होते. त्यामुळे अधिकृतपणे परवाना घेऊन स्टॉल्स उभारणाऱ्यांची संख्या वाढली होती. मात्र, यंदा महापालिकेने सहापटीने भूईभाडे वाढविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.