Vadgaon Maval News : रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत होणार माळी समाजाचा मेळावा 

एमपीसी न्युज – मावळ तालुक्यातील नाणोली तर्फे चाकण येथे शनिवारी (दि. 14) माळी समाजोन्नती मंडळ, मावळ तालुका व श्री.संत सावतामाळी मित्र मंडळ नाणोली यांच्या संयुक्त विद्यमानाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यानिमित्त समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून (Vadgaon Maval News)  राज्य महीला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित राहणार आहेत. तसेच शिरूर मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार योगेश टिळेकर, आमदार सुनील शेळके, माजी राजमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे.

Talegaon News : तळेगावात भरणार  दोन दिवसीय भव्य कॅरम स्पर्धा, 17 जानेवारी पर्यंत नाव नोंदणी

महापुरुषांच्या प्रतिमेची मिरवणूक गावात होणार आहे सायंकाळी सहा वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे संपूर्ण जीवनकार्य यावर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध व्याख्याते  निलेश जगताप यांचे व्याख्यान होणार आहे त्यानंतर  मावळ तालुका आदर्श माता पुरस्कार रत्ना कुमार बॅनर्जी (बालग्राम अनाथाश्रम मळवली), सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा यात मावळ तालुक्यातील गुणसंपन्न विध्यार्थी – विद्यार्थिनी यांना देखील सन्मानित करणार आहोत. प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते महिलांसाठी लकी ड्राॅ,  बक्षीस वितरण व मावळ तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच,ग्रा प सदस्य नगरसेवक यांचा देखील सन्मान (Vadgaon Maval News)  करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.