Talegaon News : तळेगावात भरणार  दोन दिवसीय भव्य कॅरम स्पर्धा, 17 जानेवारी पर्यंत नाव नोंदणी

एमपीसी न्यूज –  कॅरम प्रेमींच्या पुढाकारातून कै.माधव खरे व कै.मंगेश कवळेकर यांच्या स्मरणार्थ 21 ते 23 जानेवारी दरम्यान या स्पर्धेचे (Talegaon News )आयोजन करण्यात आले आहे. कॅरम प्रेमींना या स्पर्धेत भाग घेण्यासाठी 17 जानेवारी पर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे.

या स्पर्धेचे आयोजन कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने व रोटरी क्लब ऑफ तळेगेव (एमआयडीसी), लायन्स क्लब ऑफ तळेगाव,रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन (बॅच 1984- मैत्रेय ग्रुप) व खरे कॅरम क्लब तळेगाव यांच्या वतीने आयोजीत केली जात आहे.

Nigdi News : जुना रेल्वेचा अंडरपास मार्ग चालू करण्याची मागणी

या स्पर्धेचे वैशीष्ट्य म्हणजे  विजेत्याला 1 लाख 53 हजारापर्यंत रोख बक्षिसे मिळणार आहेत.ही स्पर्धा पुरुष व महिला दोघांसाठी खुली असणार आहे. दुहेरी, मिश्र दुहेरी व ज्येष्ठ नागरिक या तीन प्रकारात ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन 21 जानेवारी रोजी  क्लबचे संस्थापक अध्यक्ष संतोष दत्तात्रय खांडगे यांच्या हस्ते होणार असून या स्पर्धा कडोलकर कॉलनी येथील लायन दिपक शहा सभागृह येथे पारपडणार आहेत.

यासाठी इच्छुकांना 17 जानेवारी पर्यंत खरे कॅरम क्लब (कडोलकर कॉलनी) किंवा ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र (यशवंत नगर) या दोन ठिकाणी नाव नोंदणी करता येणार आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धक 9822325688 / 9922934310  या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.