Nigdi News : जुना रेल्वेचा अंडरपास मार्ग चालू करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरण सेक्टर 26 येथील (Nigdi News) रावेतकडे जाणारा जुना रेल्वेचा अंडरपास मार्ग चालू करण्याची मागणी भाजपचे उपाध्यक्ष समीर जावळकर यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात जावळकर यांनी म्हटले आहे की, निगडी, प्राधिकरण (Nigdi News), आकुर्डी, रावेत व इतर ठिकाणाहून आयटी पार्क व इतर कामासाठी ये-जा करणारे नागरिक तसेच मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर ये-जा करणारे नागरिक यामुळे निगडी प्राधिकरण व रावेत या मार्गावरती व तेथील धर्मराज चौक व प्राधिकरण या ठिकाणी वाहतूक कोंडी ही नित्याची झाली आहे.

यावर एक उपाय म्हणून या ठिकाणचा जुना बोगदा बंद आहे. तो चालू केल्यास येथील वाहतूक कोंडीवर मार्ग निघून वाहतूक कोंडी सुटेल. त्यामुळे हा मार्ग तत्काळ चालू करून लोकांना या रस्त्यावरून ये-जा करण्यास सोयीचे होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.