Vadgaon Maval News : महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील कामे अपूर्ण, नागरीकांच्या जीवाशी खेळ

एमपीसी न्युज – वडगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारच्या सेवा रस्त्यावरील महत्त्वपूर्ण कामे अपूर्ण राहिली आहेत. याचा विद्यार्थी, वृद्ध, महिला आणि स्थानिक नागरिकांना नाहक त्रास (Vadgaon Maval News) होत आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का, असा सवाल वडगाव शहर भाजपने उपस्थित केला आहे. सेवा रस्त्यावरील कामे तात्काळ मार्गी लावा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शहर अध्यक्ष अनंता कुडे यांनी दिला. शहर भाजपाच्या वतीने अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांना निवेदन देण्यात आले आहे.याप्रसंगी माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर,नगरसेवक किरण म्हाळसकर,माजी सरपंच संभाजी म्हाळसकर उपस्थित होते.

Mahavitran news : महावितरणच्या धडक कारवाईत 11 कोटी रुपयांची वीजचोरी उघड

वडगाव शहरा मधील राष्ट्रीय महामार्गलगत सेवा रस्त्यावरील झालेल्या दुरावस्थेबाबत जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे सेवा रस्त्याला लागून आयआरबीच्या अंतर्गत NH 4 हा मुंबई पुणे जुना राष्ट्रीय महामार्ग, (रस्ता )असून सदर खाते सेवा रस्त्याचा हा विषय आपल्या खात्याशी संबंधित असल्यामुळे आम्ही आपणास या निवेदनाद्वारे  सदर ठिकाणची चालू दयनीय परिस्थिती लक्षात आणून देत आहोत असे निवेदनात म्हटले आहे.

वडगाव मधील सेवारस्त्यावरून शाळकरी विद्यार्थी,जेष्ठ नागरिक, महिला वर्ग, कामगार वर्ग ये जा करत आहेत, सदर ठिकाणी रोडचे काम अपूर्ण आहे, ड्रेनेज लाईनचे काम केले गेलेले नाही, लाईटची व्यवस्था नाही, रस्ता दुभाजकावर गवत वाढलेले आहें,अश्या अनेक गैरसोयी निर्माण झालेल्या आहेत. भविष्य काळात आपल्या अपुऱ्या सुविधेमुळे सदर ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे, तरी आपण या निवेदनाद्वारे या परिस्थितीची गंभीर दखल घेऊन नागरिकांची गैरसोय दूर करावी अन्यथा भाजपा वडगाव शहराचे वतीने तीव्र स्वरूपाचे आपल्या खाते विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.असा इशारा  भाजपा शहरअध्यक्ष अनंता कुडे (Vadgaon Maval News) यांनी दिला आहे.आणि याची संपूर्ण जबाबदारी आपले खातेशी निगडित राहील.असे, निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.