Vadgaon Maval :सहादु महादू असवले यांचे वृद्धापकाळाने निधन

टाकवे बुद्रुक (मावळ) येथील जुन्या पिढीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, शेतकरी कुटुंबातील व वारकरी संप्रदायातील सहादु महादू असवले (वय 102) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे मागे पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुना, पुतणे, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

निर्व्यसनी असलेल्या सहादु असवले यांनी श्री क्षेत्र आळंदी- पंढरपूरची आषाढी- कार्तिकी पायी वारी नेमाने अखंड केली. प्रतिकुल परिस्थितीत सायकलवर व कावडीने दूध वाहून दुधाचा व्यवसाय केला. श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तुकाराम असवले, शिक्षक नारायण असवले व प्रगतीशील शेतकरी सुभाष असवले यांचे ते वडील होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.