Vadgaon Maval : पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्षपदी संतोष मुऱ्हे यांची निवड

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी संतोष मुऱ्हे यांची नुकतीच निवड करण्यात आली.

पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी त्यांची निवड जाहीर केली असून माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते संतोष मुऱ्हे यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

यावेळी माजी आमदार कृष्णराव भेगडे, पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, तळेगाव नगरपरिषदेचे नगरसेवक संतोष भेगडे, सरपंच दत्तात्रय पडवळ, तळेगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आशिष खांडगे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.