Somatane News : ध्येयाला प्रयत्नांची जोड दिल्यास यश हमखास : संतोष मुऱ्हे

जिल्हास्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत मावळाचा झेंडा

एमपीसीन्यूज  :  ध्येय ठेवून त्याला प्रयत्नांची जोड दिली तर व्यक्तीला यशापासून कोणीही दूर  ठेऊ शकत नाही, असे प्रतिपादन मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष मुऱ्हे यांनी यांनी केले. 

पुण्यातील कोरोगाव  पार्क येथे पार पडलेल्या  जिल्हास्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत मावळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष  संतोष मुऱ्हे आणि  तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक  किशोर भेगडे यांनी मास्टर  वयोगटात प्रथम क्रमांक  पटकावला. हे दोघेही 40  वर्षांपुढील वयोगटातील आहेत. त्यामुळे या वयोगटात राजकीय क्षेत्रांत कार्यरत असतानाही वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल मुऱ्हे आणि  भेगडे यांचे मावळ तालुक्यातून  कौतुक  होत आहे.

या पार्श्वभूमीवर सोमाटणे फाटा येथे माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधताना मुऱ्हे यांनी  यश मिळविण्यासाठी ध्येयाला प्रयत्नांची  जोड देण्याचे आवाहन  तरुणाईला केले.

महाराष्ट्र पावर लिफ्टींग असोसिएशन मुंबई सलग्न अमेतुर पावर लिफ्टींग असोसिएशन  पुणे यांच्या वतीने  कोरेगाव पार्क  येथे नुकतीच जिल्हास्तरिय पॉवरलिफ्टींग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या  स्पर्धेत मावळातील 65 वर्षाच्या महिलेसह नऊ खेळाडूंनी बाजी मारली. तसेच  ‘स्ट्रॉंग मॅन ऑफ पुणे’चा बहुमानही मावळने मिऴवला.

या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातून  वेगवेगळ्या गटात  एकूण सुमारे 140  पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले होते. यात मावळ तालुक्यातून सोमाटणे येथील बिग बॅग फिटनेस जिमममधील विविध  गटातील आठ व तळेगाव येथील इंद्रायणी जिमचा एक, असे एकूण नऊ स्पर्धक सहभागी झाले होते.

अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत मावळातील सर्वच स्पर्धकांनी बाजी मारुन विविध पदके पदक मिळवळी. त्यामुळे   मावळ तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला.  स्पर्धेतील सर्व विजेत्या खेळाडूंची राज्यस्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

स्पर्धेतील  विजेत्या खेळाडूंची नावे व वयोगटानुसार पुढीलप्रमाणे 

पुरुष गट : मास्टर गट (  74 किलो)  प्रथम क्रमांक -दत्ता जाधव, व्दितीय क्रमांक -संतोष मु-हे.

(105 किलो) प्रथम क्रमांक मुकुल धनराज भामरे, व्दितीय क्रमांक नगरसेवक किशोर भेगडे.

(93 किलो) – प्रथम क्रमांक रोहन मोरे.

सिनीअर वजनी गट :  (120 किलो) प्रथम क्रमांक- बिग बंग फिटनेस जिमचे मालक प्रशांत झा. 74 किलो वजनी गटातून   ट्राँग मॅन ऑफ पुणेचा मान दत्ता जाधव याने मिळवला.

महिला गट : (63 किलो) प्रथम- 65 वर्षीय  लॅारेन मोरे.  (69  किलो)- प्रथम क्रमांक राजश्री वाघचौरे.

पंच म्हणून रवींद्र  यादव व नितीन म्हाळसकर यांनी काम पाहिले.  स्पर्धेतील सर्वच स्पर्धक सोमाटणे येथील बिग बॅग फिटनेस जिमधले विद्यार्थी असून जीम चालक प्रशांत झा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे यश मिळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.