Vadgaon Maval : वडगाव मावळ लिगल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. सोमनाथ पवळे यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ लिगल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या सन 2024-25 साठीच्या (Vadgaon Maval) अध्यक्षपदी अ‍ॅड. सोमनाथ सिताराम पवळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. वडगाव न्यायालयातील वकील बार रूम मध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये ही निवड करण्यात आली.

 या बैठकीसाठी जेष्ठ विधिज्ञ अ‍ॅड एल.एम.कौशल, सल्लागार अ‍ॅड नामदेव दाभाडे, मार्गदर्शक अ‍ॅड रंजनाताई भोसले,अ‍ॅड एस एम मोरे, मा.अध्यक्ष धनंजय कोद्रे, मावळते अध्यक्ष अ‍ॅड दीपक. चौधरी, सचिव अ‍ॅड राम शहाणे,ऑडिट अजित वहिले आदी मान्यवरांसह अनेक वकील बंधू-  भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Today’s Horoscope 22 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

वडगाव मावळ दिनांक 20 जानेवारी, 2024-वडगाव न्यायालयातील वकीलांसाठी काम करणारी एक नामांकित संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या वडगाव मावळ लिगल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या सन 2024-25 साठीच्या अध्यक्षपदी एक अभ्यासू वकील व समाजकार्याची विशेष आवड असलेले अ‍ॅड सोमनाथ सिताराम पवळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

असोसिएशनचे मावळते अध्यक्ष अ‍ॅड दीपक चौधरी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे आज अ‍ॅड पवळे यांचेकडे सोपवली. वडगाव न्यायालयाच्या वकील बार रूममध्ये असोसिएशनच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीची निवड व पदग्रहण सोहळ्याचे आयोजन यावेळी  करण्यात आले.

यावेळी असोसिएशनच्या कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य म्हणून खालील वकीलांची निवड करण्यात आली…
1) अ‍ॅड सोमनाथ पवळे- अध्यक्ष
2) अ‍ॅड प्रिया पंडित- उपाध्यक्षा
3) मोनाली कुलकर्णी- शेलार- उपाध्यक्षा
4) अ‍ॅड प्रणोती पिंगळे- सचिव
5) अ‍ॅड अक्षय रौंधळ- सचिव
6)अ‍ॅड मिनाक्षी गणेश ढोरे- खजिनदार

7) अ‍ॅड सुबोध कालेकर- सदस्य
8) अ‍ॅड करण लोंढे- सदस्य
9)अ‍ॅड रोहित कदम- सदस्य
10) अ‍ॅड स्नेहा परदेशी- सदस्या
11) अ‍ॅड सागर शेटे- सदस्य
12) अ‍ॅड प्रियांका शिंदे- सदस्या
13) अ‍ॅड अंकित आलम- सदस्य
14) अ‍ॅड हेमंत साबळे- सदस्य
15) अ‍ॅड युक्ता पवार- सदस्य
असोसिएशनच्या सर्व आजी- माजी पदाधिकाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व असोसिएशन करत असलेल्या सामाजिक कार्याचे सर्वांनीच कौतुक केले. सर्व मान्यवरांनी यावेळी नवनिर्वाचित कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
नवनिर्वाचित अध्यक्ष अ‍ॅड सोमनाथ पवळे यांनी यावेळी सर्वांचे आभार मानले व सर्वांना सोबत घेवून काम करणार असल्याचे (Vadgaon Maval) सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.