Today’s Horoscope 22 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग -Today’s Horoscope 22 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – मंगळवार.

तारीख – 23.01.2024.

शुभाशुभ विचार – 8 प. चांगला दिवस.

आज विशेष – भौमप्रदोष.

राहू काळ – दुपारी 3.00 ते 4.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आज नक्षत्र – आर्द्रा.

चंद्र राशी – मिथुन.
—————————–
मेष – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज तुमचा जास्तीत जास्त वेळ घराबाहेर जाईल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल. मुले आज खेळात जास्त रमतील. कौटुंबिक सदस्यांत मतभेद असतील.

वृषभ- ( शुभ रंग- पिस्ता)

व्यवसायातून आवक मुबलक असेल. फिरते विक्रेते आज चांगली कमाई करतील. महत्त्वाच्या चर्चेत तुमचेच म्हणणे इतरांवर लादू शकाल. आज प्रवास त्रासदायक होतील.

मिथुन – ( शुभ रंग- डाळिंबी)

आज गरजूंना यथाशक्ती मदत करण्याकडे तुमचा कल असेल. मन हळवे करणारा एखादा प्रसंग घडेल. आज तुम्ही भावनेच्या भरात घेतलेले निर्णय मात्र चुकू शकतात.

कर्क – ( शुभ रंग – हिरवा)

आज दिवस खर्चाचा असल्याने बचतीचा विचारही नको. संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. उंची वस्त्र खरेदी कराल. गृहिणींना पूर्वीची बचत कामी येईल.

सिंह -( शुभ रंग – गुलाबी)

आज इच्छापूर्तीचा दिवस असून कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. खिशात पैसा खेळता असल्याने जिवलग मित्र तुमचा शब्द झेलतील.

कन्या – ( शुभ रंग- मोरपंखी)

आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्यास प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात आज महत्त्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होऊ शकतील. कुटुंबीयांना वेळ देणे आज अवघडच आहे.

तूळ- ( शुभ रंग- राखाडी)

आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची खात्रीच बाळगा. आज एखाद्या धार्मिक कार्यात तुम्ही सहभाग घ्याल. वडीलधाऱ्यांचा मान राखाल.

वृश्चिक- ( शुभरंग – तांबडा)

आज कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. हीतशत्रू कदाचित मित्रांमध्येच लपलेले असू शकतात. कोणतीही धाडसाची कामे आज करू नका. सावध असा.

धनु (शुभ रंग- सोनेरी)

कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने तुम्ही आज तुमच्या कार्यक्षेत्रातही आपले महत्त्व सिद्ध करू शकाल. अडचणीच्या प्रसंगी तुम्हाला जोडीदाराची खंबीर साथ राहील.

मकर- (शुभ रंग- गुलाबी)

कोणतीच गोष्ट आज सहज साध्य नसली तरीही आज तुमची काही येणी असतील तर ती वसूल होऊ शकतात. प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्कीच मिळेल.
कुंभ – (शुभ रंग- चंदेरी)

कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहतील. हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पैसा उपलब्ध होईल. आज बरेच दिवसांनी मित्रमंडळींच्या सहवासात रमाल.

मीन -( शुभ रंग- जांभळा)

आज काही घरगुती प्रश्नात लक्ष देणे गरजेचे वाटेल. मुलांच्या अभ्यासातही डोकावणे गरजेचे आहे. काही रसिक मंडळी सहकुटुंब एखाद्या सहलीचे आयोजन करतील.

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन – 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.