Vehicle Theft : वायसीएम हॉस्पिटल मधून भरदिवसा दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात दोन दुचाकी वाहने चोरीचे प्रकार उघडकीस आले आहेत. पिंपरी मधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाच्या पार्किंग मधून भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली आहे. तर यमुनानगर निगडी येथे रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली दुचाकी चोरीला गेली आहे.

_MPC_DIR_MPU_II

केतन सातप्पा कमळकर (वय 26, रा. लक्ष्मी चौक, हिंजवडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कमळकर यांची 40 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 14 / एफ के 2461) अज्ञात चोरट्यांनी वायसीएम हॉस्पिटलच्या पार्किंग मधून चोरुन नेली. हा प्रकार 4 मे रोजी सकाळी दहा ते सव्वा अकरा वाजताच्या सुमारास घडला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

दुचाकी चोरीची दुसरी घटना यमुनानगर निगडी येथे ठाकरे संकुलच्या कॉर्नरवर घडली. मंदार अच्युत कुलकर्णी (वय 46, रा. यमुनानगर, निगडी) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुलकर्णी यांची पंधरा हजार रुपयांची दुचाकी (एम एच 14 / बी झेड 9263) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार 21 एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.