Pimpri : जखमांचे प्रमाण वाढवून देण्यासाठी वायसीएम हॉस्पिटल मधील डॉक्टरला मारहाण; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – सीटी स्कॅन न करता एमएलसी ( Pimpri)  रिपोर्ट द्यावा तसेच त्यामध्ये जखमांचे प्रमाण वाढवून द्यावे, अशी मागणी करत दोघांनी वायसीएम हॉस्पिटल मधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यास मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 4) मध्यरात्री पावणे एक वाजताच्या सुमारास घडली.

शरवीन नॉरमन आरलेन (वय 23), नॉरमन लायरस आरलेन (वय 48, दोघे रा. मोशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी नरेश शिवानंद अंजनादेवी (वय 25, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Maharashtra : पुढील दोन ते तीन दिवस राज्यात ढगाळ वातावरण, अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नरेश अंजनादेवी पिंपरी मधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात इमर्जन्सी वॉर्ड क्रमांक 50 येथे ड्युटीवर होते. सोमवारी मध्यरात्री आरोपी नॉरमन हा त्याच्या मुलीला वायसीएम हॉस्पिटल मध्ये घेऊन आला. त्याच्या तीन मुलींना मारहाण झाली होती. त्यापैकी एका मुलीचे सीटी स्कॅन करणे आवश्यक होते. त्यामुळे डॉक्टरांनी सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला.

मात्र आपण सीटी स्कॅन करणार नाही. त्याशिवाय आम्हाला एमएलसी पेपर लवकर द्या. त्यामध्ये जखमांचे प्रमाण वाढवून द्या, असे म्हणत आरोपींनी फिर्यादी नरेश आणि डॉक्टर अथर्व यांना मारहाण करून शिवीगाळ केली. माझी आमदाराशी ओळख आहे. उद्या तुमच्याकडे पाहून घेतो, अशी आरोपींनी धमकी दिली.

दरम्यान, या प्रकरणावरून वायसीएम हॉस्पिटल मध्ये काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. आरोपींनी हॉस्पिटल मध्ये आरडाओरडा करत राडा घातल्याने पोलिसांनी मध्यस्थी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांनी ( Pimpri) सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.