Maharashtra : पुढील दोन ते तीन दिवस राज्यात ढगाळ वातावरण, अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा

एमपीसी न्यूज – उत्तरेत सक्रिय असलेला थंड हवेचा प्रवाह ( Maharashtra) किनारपट्टीपर्यंत येत असल्याने बाष्पाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी आजपासून पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

गेल्या आठवडाभरापासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू आहे. काही जिल्ह्यांना तर गारपीटीने देखील तडाखा दिला आहे. ज्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसह फळबागाची नासधूस झाली असून शेतकरी संकटात सापडला आहे.अशातच शेतकऱ्यांना सावरण्याची एकही संधी न देता, पुन्हा अवकाळी पाऊस अन् गारपीट होण्याची शक्यता आहे. आजपासून पुढील दोन दिवस नागपूरसह विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यात पावसाचा देण्यात आला आहे.

Pimpri : राजकीय इच्छाशक्तीशिवाय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार नाही – अरविंद दोडे

तर मराठवाड्यातील परभणी, बीड, हिंगोली आणि मध्य महाराष्ट्रात पुणे तसेच नगर जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी तुफान गारपीट होऊ शकते, असंही हवामान खात्याने सांगितले आहे.

मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात आज (सोमवारी) पावसाचा अंदाज आहे. खानदेशात जळगाव व धुळे जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलाय. विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात तुफान पावसाची ( Maharashtra)  शक्यता आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.