YCMH : वायसीएमध्ये रुग्णवाहिका चालकांसाठी स्वतंत्र रूमची मागणी

एमपीसी न्यूज – श्रीमंत महापालिका असा लौकिक असलेल्या (YCMH) पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील वाहनचालकांना बसायची व्यवस्था नाही. रूम नाही. तुटलेले बेंचेस तुटलेले टेबल, मोठ्या प्रमाणात ढेकणे आहेत. त्यामुळे वाहनचाकांसाठी रुम देण्याची मागणी चालकांनी केली आहे.

रुग्णवाहिका शहरात अत्यावश्यक सेवा म्हणून सतत चांगले कार्य करत असतात. कोरोना काळात तर सर्व वाहन चालकांनी उल्लेखनीय कामगिरी करून पिंपरी-चिंचवड शहरात नावलौकिक मिळविला. गेल्या दोन वर्षापासून वाहन चालकांना साधी बसायची व्यवस्था नाही. चांगल्या प्रकारची रूम देखील त्यांना देण्यात आलेली नाही. तुटलेले बेंचेस आहेत.

Pimpri : बौद्धनगर झोपडपट्टीचे होणार सर्व्हेक्षण, पात्रता यादी करणार तयार

सध्या असलेल्या रुममध्ये बसण्याची व्यवस्था नाही. स्वच्छता, (YCMH) रंगरंगोटी नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. स्वतंत्र स्वच्छतागृह नाही. रात्रपाळीमध्ये चालकांना आरामाची गैरसोय होत आहे. वायसीएम मधील ज्या रूम रिकाम्या आहेत. त्या रूममध्ये कचरा ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे वाहनचालकांना चांगली सोसीयुविधा युक्त स्वतंत्र रुम देण्याची मागणी चालकांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.