Pimpri : बौद्धनगर झोपडपट्टीचे होणार सर्व्हेक्षण, पात्रता यादी करणार तयार

एमपीसी न्यूज – झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत (Pimpri) (एसआरए) पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामधील सर्व झोपडपट्टयांमध्ये सर्व्हेक्षण करण्याचे कामकाज करण्याचे नियोजन आहे. पिंपरी- चिंचवड महापालिका हद्दीतील स.नं.13,14,16,17 बौद्धनगर, पिंपरी अंदाजे क्षेत्रफळ 15637.37 चौरस मीटरवरील झोपडीधारकांची पात्रता यादी करण्यात येणार आहे. त्यासाठी झोपडीधारकांचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. सर्व्हेक्षण 15 मार्च पासून किंवा त्यानंतर सुरु करण्यात येणार आहे.

स्वतंत्र प्रवेशद्वारासह स्वतंत्र झोपडी आहे अशा प्रत्येक झोपडीस क्रमांक देण्यात येवून त्यामध्ये वास्तव्यास असलेल्या झोपडीधारक व त्याची पत्नी/तिचा पती या दोघांची नावे नमूद असलेली झोपडीधारकांची प्राथमिक सर्वेक्षण यादी तयार करण्यात येईल.

झोपडीच्या वापराचा प्रकार विचारात घेवून झोपडीधारकाकडून त्याची पात्रता निक्षित करणेकामी शासन निर्णयानुसार आवश्यक असलेली कागदपत्रे, जोडपत्र 3/4, आवश्यक प्रपत्रे व पुराव्याचे कागदपत्र प्राप्त करुन घेण्यात येतील.

या कार्यालयामार्फत देण्यात आलेले शासकीय जोडपत्रे पुराव्यांसह (Pimpri) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे सादर करण्यात आल्यानंतर प्राधिकरणाच्या सक्षम प्राधिका-यामार्फत पात्रता यादी (परिशिष्ट-3) तयार करण्याचे कामकाज करण्यात येईल. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सक्षम प्राधिका-यांनी जोडपत्रे व पुराव्यांची छाननी केल्यानंतर तसेच आवश्यकता असल्यास स्थळ पाहणी करुन अशा झोपडीधारकांची पात्रता निश्चित करण्यात येईल.

प्राधिका-यामार्फत तयार करण्यात आलेली प्राथमिक पात्रता यादी (परिशिष्ट-2) प्रसिध्द करुन त्यावर हरकती व सूचना/आक्षेप मागविण्यात येतील. प्रसिध्द करण्यात आलेल्या प्राथमिक यादीमध्ये समाविष्ट असलेल्या झोपडीधारकांच्याबाचत हरकती अथवा अपात्र झोपडीधारकाला पात्रतेकरिता सादर करावयाचा दावा तसेच यादीमध्ये समाविष्ट नसलेल्या झोपडीधारकास पात्रतेसाठी करावयाचा दावा, नावातील दुरुस्त्या इ. हरकती/आक्षेप पुराव्यांसह सादर करण्यास 15 दिवसांचा कालावधी देण्यात येईल.

Pimpri : आगीच्या घटनांमधील जखमी रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

प्राप्त झालेले आक्षेप/हरकती/दावे यासंदर्भात प्रत्यक्ष सुनावणी (Pimpri) आवश्यक तर स्थळ पाहणी करुन सक्षम प्राधिकारी यांचेमार्फत अंतिम निर्णय घेण्यात येईल व सदर मिळकतीवरील झोपडपट्टी क्षेत्रातील झोपडीधारकांची पात्रता यादी (परिशिष्ट-2) अंतिमतः प्रसिध्द करण्यात येईल.

अंतिम करण्यात आलेल्या पात्रता यादी (परिशिष्ट-2) मध्ये अपात्र म्हणून समाविष्ट अरालेल्या झोपडीधारकास अंतिम पात्रता यादी प्रसिध्द करण्यात आल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आत सचिव झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरण पुणे यांच्याकडे पात्रतेकरिता प्रथम अपिल दाखल करता येईल.

त्यांच्या निर्णयानंतर 30 दिवसांचे आत विभागीय तक्रार निवारण समिती, पुणे यांचेकडे द्वितीय अपिल दाखल करता येईल. तथापि पात्रता यादीमध्ये झोपडीधारकाचे नाव व अन्य तपशील यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी संबंधित झोपडीधारकास सक्षम प्राधिकारी, झोपुप्रा, पुणे यांचेकडे स्वतंत्र अर्ज करता येईल. या मिळकतीवरील झोपडपट्टी क्षेत्रातील सर्व झोपडीधारकांनी सर्वेक्षणात सहभागी होवून योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.