Bhosari : विदर्भ माळी समाज उत्कर्ष संघ भोसरी यांचा युवक-युवती परिचय मेळावा उत्साहात

एमपीसी न्यूज – विदर्भ माळी समाज उत्कर्ष संघ भोसरी आयोजित उपवर युवक युवती परिचय मेळावा उत्साहात पार पडला. हा मेळावा रविवारी (दि 20) भोसरीमधील इंद्रायणी मंगल कार्यालय येथे झाला. मेळाव्याचे उदघाटन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी महापौर राहुल जाधव, गोविंदराव वैराळे, डी. के. बापू माळी, सुखदेव वानखडे, विनायकराव काळपांडे, रवि वानखडे, डॉ. प्रकाश ढोकणे, सम्राट फुगे, श्रीकृष्ण वावगे, नामदेव बगाडे, प्रभाकर सातव, जनार्दन फुलारी, निलिमा उमाळे, उद्योजक संदीप गवळी, कॅप्टन प्रभुदास सपकाळ, गोविंद सुमन डाके, वसंत बोराटे, आनंदराव कुदळे, विजय लोखंडे, धनंजय आल्हाट, परशुराम आल्हाट, रामदास खंडारे, उत्तमराव बोराटे, संतोष लोंढे आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी अवयव दानाचा उपक्रम राबविण्यात आला. त्यासाठी पियुष येणकर व मनिषा येनकर यांनी योगादान दिले. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रेशीमगाठी मोबाईल अॅप लाँच करण्यात आले. यासाठी प्रविण वालोकार यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर ‘रेशिमगाठी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी आमदार महेश लांडगे म्हणाले, “विदर्भ माळी समाज उत्कर्ष संघ भोसरी मध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहे. डिजिटल युगाची कास धरून त्यांनी तयार केलेले मोबाईल अॅप्लिकेशन युवक-युवतींसाठी आपला योग्य जोडीदार निवडण्यासाठी अत्यंत उपयोगी पडणार आहे. समाजातील नागरिक संघाला देत असलेला प्रतिसाद वाखाणण्याजोगा आहे. विदर्भ माळी समाज उत्कर्ष संघाने आजवर कौतुकास्पद काम केले आहे. याचा समाजातील नागरिकांनी लाभ आणि आदर्श घ्यावा.”

प्रास्ताविक श्रीकृष्ण अत्तरकर यांनी केले. तर अंजली भोपळे, नरेंद्र भोपळे या नवदाम्पत्याने सूत्रसंचालन केले. प्रदिप तायडे, दामोदर गाडगे, गजानन निमकर्डे, रामक्रुष्ण बोंबटकार, राजु रोटे, आशिष उमरकर, शरद अत्तरकर, रवी घाटे, योगेश गाडगे, अरुण वानखडे, अरुण गीर्हे, गजानन सातव, प्रल्हाद बगाडे, अमोल बगाडे, संजय बगाडे, उमेश तायडे, सुरेश जुमडे, तुषार उमाळे आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.