Junnar : बिबट्याने पळवली मेंढपाळाची चार महिन्याची मुलगी

एमपीसी न्यूज – बिबट्याने मेंढपाळाच्या वस्तीवर हल्ला करत चार महिन्याच्या मुलीला पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार जुन्नर तालुक्यातील येडगाव, खानेवाडी येथे मंगळवारी रात्रीच्या सुमाराम घडला.

कल्याणी सुखदेव झिटे असे या चिमुकलीचे नाव आहे. जवळच्या शेतातच या चिमुकलीचा मृतदेह आढळला.

सध्या राज्यात असलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे धनगर समाज या गावातून त्या गावात स्थलांतर करीत असतात. जुन्नर तालुक्यातील
येडगाव खानेवाडी येथील एका शेतात असाच एक मेंढपाळाचा तांडा वस्तीला होता.

मंगळवारी रात्रीच्या सुमारास एका बिबट्याने या वस्तीवर हल्ला करत चार महिण्याच्या कल्याणीला उचलून नेले. तिच्या कुटुंबियांना जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा त्यांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर काही अंतरावर असलेल्या फ्लॉवरच्या शेतात तिचा मृतदेह आढळून आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.