Pimpri : कष्टकरी महिलांची संक्रांत ‘गोड’; महिलांनी लुटले वाण

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेनेने राबवला उपक्रम

एमपीसी न्यूज – मकरसंक्रांतीचा सण महिलांसाठी आनंदाची पर्वणी असतो. मात्र, कष्टकरी महिलांना या आनंदापासून वंचित रहावे लागते. या महिलांसाठी शिवसेना आणि महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने शहरात तीन ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात वाण म्हणून या महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. यामुळे कष्टकरी महिलांची संक्रांत ‘गोड’ झाली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

सकाळी सात वाजता भोसरी येथील भैरवनाथ मंदिरात अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पिपरी-चिंचवड शहरातील भोसरी नाका (भोसरी) रहाटणी नाका (पिंपरी) आणि डांगे चौक नाका (चिंचवड) येथील कष्टकरी महिलांना संक्रांतीचे वाण म्हणून साडी वाटप करण्यात आले.

महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद, जिल्हा शिवसेना संघटिका सुलभा उबाळे, शहरप्रमुख योगेश बाबर, उपशहर प्रमुख युवराज कोकाटे, अभिमन्यु लांडगे, युवासेना अधिकारी सचिन सानप, शहर संघटिका आशा भालेकर, परशुराम अल्हाट, सिमा जगदाळे, संघटनेचे सचिव पांडुरंग कदम, सर्जेराव कचरे, बांधकाम विभागाच्या उज्वला गर्जे, प्रितेश शिंदे, संघटनेचे संघटक वामन दांडे, नीलेश साळुंके, दादासाहेब देडे, अंबादास उदार, मारुती जाधव, राजू जाधव व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी इरफान सय्यद म्हणाले की, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 80 टक्के समाजकारण तर 20 टक्के राजकारणाचा मंत्र दिला आहे. हा मंत्र घेवून शिवसेनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांना आदरांजली म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.