Bhosari : तिरंगा बाईक रॅलीने ‘राष्ट्रभक्तीचा जागर’; दीड हजार दुचाकीस्वारांचा सहभाग

एमपीसी न्यूज – भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त भोसरीमध्ये (Bhosari) तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने काढलेल्या या रॅलीत सुमारे दीड हजार दुचाकीस्वारांनी सहभाग घेतला. तसेच, ‘‘भारत माता की जय’’ अशा जयघोषामुळे परिसर दणाणला.

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त”हर घर तिरंगा” या अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टी, भोसरी (Bhosari) विधानसभा यांच्या वतीने स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून “भव्य तिरंगा बाईक रॅली” चे आयोजन करण्यात आले. रॅलीस भोसरी येथे सुरुवात होऊन आळंदी रोड मार्गे  दिघी येथील सैनिक भवन येथे समारोप करण्यात आला. तसेच “मेरी माती, मेरा देश” या अभियान अंतर्गत सैनिक भवन, दिघी येथे देशसेवेसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार व शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली.

पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर राहुल जाधव, माजी स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, संतोष लोंढे, विलास मडेगिरी, टेल्को युनियनचे अध्यक्ष सचिन लांडगे, माजी नगरसेवक विकास डोळस, सागर गवळी, राजेंद्र लांडगे,  निर्मला गायकवाड, सोनाली गव्हाणे, दिनेश यादव, गोपी अप्पा धावडे, पांडाभाऊ साने, राजेश सस्ते, सुधीर काळजे, दत्ता गव्हाणे, उदय गायकवाड, कविता भोंगाळे, निलेश लोंढे, संतोष गाढवे, हनुमंत लांडगे,  किसन बावकर, विकास बुर्डे, अर्जुन ठाकरे, सम्राट फुगे आदी उपस्थित होते.

PCMC :  महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा सक्षम; माता मृत्यू प्रमाणात घट

समर्पण आणि राष्ट्रभक्तीचे प्रतिक असलेला तिरंगा… चंद्र, सूर्य असेपर्यंत अभिमानाने फडकत राहिला पाहिजे. यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकांने तिरंगा राष्ट्रध्वजाचा आदर आणि आपल्या राष्ट्रभूमीबाबत त्याग भावना ठेवली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पिंपरी-चिंचवड  (Bhosari) शहरात ‘‘हर घर तिरंगा अभियान’’ प्रभावीपणे राबवण्यात आले. याला शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल सर्व शहरवासीयांचे आमदार लांडगे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.