Pimpri : हितेश मूलचंदानी हत्येच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – हितेश मूलचंदानी या तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ पिंपरीत कॅन्डल मार्च काढण्यात आला. यामध्ये पिंपरी कॅम्प परिसरातील सर्व व्यापारी बांधव आणि महिलांनी सहभाग घेतला. हा कॅन्डल मार्च शगुन चौक ते बाबा छत्तूररामलाल मंदिर या दरम्यान काढण्यात आला.

हितेश मुलचंदानी याच्या हत्येचा निषेध व्यक्त करत पिंपरीमधील सर्व व्यापारी बांधवांनी बुधवारी (दि. 24) पिंपरी मार्केट परिसरातील दुकाने बंद ठेवली. ‘वुई वॉन्ट जस्टीस’ ‘गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे’ असे फलक घेऊन व्यापा-यांनी निदर्शने केली.

हॉटेलमध्ये झालेल्या वादावरून सुरु झालेली भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या हितेश मुलचंदानी या युवकाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि. 22) पहाटे पिंपरी-चिंचवड महापालिका इमारतीच्या मागील बाजूच्या रस्त्यावर घडली. या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ पकडून त्यांना कठोर शासन करावे, याबाबत पिंपरीमधील सिंधी बांधवांच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले.

पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करावी. आरोपींना कठोरात कठोर शासन करावे. या घटनेनंतर सर्व सिंधी बांधव भीतीच्या वातावरणात आहेत. त्यामुळे पिंपरी परिसरात पोलीस गस्त वाढवावी. तसेच रात्री अकरापूर्वी सर्व दुकाने, हॉटेल, आईसक्रीम पार्लर, पथारीवाले यांची दुकाने बंद व्हायला हवीत. अशी मागणी सिंधी बांधवांकडून करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.