Chikhali: पूर्णानगर येथे पर्यटनस्थळ विकसित करणार; 15 कोटींचा खर्च 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पूर्णानगर येथील सेक्‍टर क्रमांक 18 सीडीसीमधील मोकळ्या जागेवर पर्यटन स्थळ विकसित केले जाणार आहे. त्यासाठी 14 कोटी 96 लाख 80 हजार रुपयांचा खर्च येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली. 

प्रभाग क्रमांक 11 मधील पूर्णानगर येथील सेक्‍टर क्रमांक 18 सीडीसी मधील मोकळ्या जागेवर पर्यटन स्थळ विकसित केले जाणार आहे. त्यासाठी 16 कोटी 3 लाख, 21 हजार 309 रुपयांची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये रॉयल्टी आणि मटेरियल टेस्टिंग चार्जेस वगळण्यात आले होते. या निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या मेसर्स बी. के. खोसे या ठेकेदाराने 6.75 टक्के कमी दराने म्हणजेच 14 कोटी 69 लाख 99 हजार आणि  रॉयल्टी चार्जेस 22 लाख, 77 हजार, 515 असे 14 कोटी, 96 लाख, 80 हजार, 581 रुपयांवर काम करण्याची तयारी दर्शविली आहे.

त्यानुसार पर्यटनस्थळ विकसित करण्याचे काम बी. के. खोसे या ठेकेदाराला दिले आहे. त्याच्याकडून 14 कोटी 96 लाख 80 हजार रुपयात काम करुन घेण्यास आणि त्याच्यासोबत करारनामा करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.