Moshi : पूर्णानगर मधून सव्वा लाखांचे बांधकाम साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज – पूर्णानगर चिखली येथून चौघांनी एक लाख 34 हजार रुपयांचे (Moshi) बांधकामाचे साहित्य चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 10) सकाळी उघडकीस आली.

MPC News Special : ऑनलाइन टास्कच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी लुटले साडेपाच कोटी

सचिन प्रवीणभाई पटेल (वय 29, रा. मोशी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी पूर्णानगर येथे ठेवलेले एक लाख 34 हजार 370 रुपये किंमतीचे बांधकामाचे साहित्य चोरीला गेले. सोमवारी पहाटेच्या वेळी दोन रिक्षांमधून चार अनोळखी चोरटे आले. त्यांनी हे साहित्य रिक्षात भरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत (Moshi) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.