Nigdi : सावरकर महिला मंडळातर्फे आयोजित ‘विंदा दर्शन’ कार्यक्रम उत्साहात

एमपीसी न्यूज – निगडी (Nigdi) प्राधिकरणातील सावरकर मंडळाच्या महिला विभागाने मंगळवारी (दि. 25 जुलै) ‘विंदा दर्शन’ हा विंदा करंदीकरांच्या कवितांचा कार्यक्रम आयोजित केला होता. विंदांची कन्या जयश्री काळे यांनी त्यांच्या कवितांचे सादरीकरण केले. सावरकर मंडळाच्या कॅप्टन कदम सभागृहात हा कार्यक्रम  झाला.

Loyla Football : बिशप्स, जे.एन.पेटिट, ब्लू रिज प्रशाला संघांची आगेकूच

जयश्री काळे यांनी सुप्रसिद्ध कवी गोविंद विनायक करंदीकर यांनी लिहिलेल्या बाल-गीते, प्रेमगीते आणि स्त्री- जीवनावरील गीते व कविता सादर केल्या. त्यांनी सादर केलेल्या विंदांच्या बालवयातील “शेवटचा लाडू”, स्त्री-जीवनावर आधारित “झपताल”, मुंबईच्या धकाधकीच्या जीवनावर आधारित “तेच ते”, “चुकली दिशा तरी”, “घेता”, निवडणुकीवर आधारित “सब घोडे बारा टक्के” असे अनेक कविता प्रकार त्यांनी सादर केले.

कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमा पूजनाने झाली. अशा सर्व गीतांचा आणि कवितांचा श्रोत्यांनी भरपूर आस्वाद घेतला. जयश्री काळे यांच्या कविता सादरीकरणाला प्रेक्षकांनी उत्तुंग दाद दिली.

सावरकर मंडळ महिला विभागाच्या अध्यक्षा नेहा साठे, कार्याध्यक्षा अश्विनी अनंतपुरे, सह – कार्याध्यक्षा वैदेही पटवर्धन, मंडळाच्या सचिव अ़ॅड हर्षदा पोरे, लेखिका माधुरी वैद्य डिसोजा, तसेच संपदा पटवर्धन, उन्नती वैद्य, शीतल गोखले, विनीता श्रीखंडे, सुप्रिया सोलांकुरे यांच्यासह जवळपास 60 ते 65 सभासद उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.