Talegoan : विनोद शिंदे यांची ऑर्डनन्स डेपो वर्कर्स युनियनच्या जेसीएम सदस्यपदी निवड

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील सामाजिक कार्यकर्ते आणि कामगारनेते विनोद बबनराव शिंदे यांची ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉइज फेडरेशनशी संलग्न असलेल्या ऑर्डनन्स डेपो वर्कर्स युनियनच्या जेसीएम सदस्यपदी एकमताने नुकतीच निवड करण्यात आली.

संघटनेचे अध्यक्ष शंकरराव भेगडे हे सेवानिवृत्त झाल्यामुळे रिक्त झालेल्या जेसीएम सदस्यपदी ही निवड करण्यात आली. यावेळी संघटनेचे सरचिटणीस मयूर भेगडे, उपाध्यक्ष प्रकाश ओव्हाळ, वर्क्स कमिटीचे उपाध्यक्ष अरुण तापकीर, ऑर्डनन्स डेपो सोसायटी क्रमांक 1 चे अध्यक्ष दीपक दाभाडे, संघटनेचे उपाध्यक्ष सुरेश दाभाडे, कामगार नेते सोमनाथ सासवडे, महेश शिंदे, बाळासाहेब दाभाडे, रोहिदास फंड, उत्तम कांबळे, मंगल गायकवाड, सिध्दधोन कांबळे, शहाजी जगताप, सुहास वाटरकर, टी.एन.धनशेखर, छबुराव दिवसे आदी उपस्थित होते.

विनोद शिंदे हे उत्कृष्ट संघटक म्हणून ओळखले जातात. छत्रपती शिवाजी कामगार मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. मागील 20 वर्षांपासून संघटनेच्या विविध पदावर त्यांनी काम केले आहे. तरुण ऐक्य मित्र मंडळ आणि राजा शिवछत्रपती मंडळाचे ते सल्लागार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.