Pune : सवलतीच्या दरामध्ये मोतीबिंदू आणि नेत्र शस्त्रकिया

दत्तात्रय वळसे आय हॉस्पिटल, व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशन व पुणे मनपा यांचा संयुक्त उपक्रम

एमपीसी न्यूज- दत्तात्रय वळसे आय हॉस्पिटल, व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशन आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सवलतीच्या दरामध्ये गरजू व्यक्तींसाठी नेत्र तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि लॅसिक सर्जरीद्वारे कायमचा चष्मा घालवणे या उपचारांचा समावेश आहे.

सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून दत्तात्रय वळसे आय हॉस्पिटल, व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशन आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या नेत्र तपासणी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये कोणत्याही नंबरचा चष्मा लॅसिक सर्जरीद्वारे कायमचा घालवता येतो. या शस्त्रक्रियेला सामान्यतः 50 हजार रुपयांचा खर्च येतो. मात्र ही शस्त्रक्रिया फक्त 14 हजार रुपयांमध्ये केली जाणार आहे. त्याचप्रमाणे मोतीबिंदू शस्त्रक्रिया 20 हजार रुपयांऐवजी फक्त 4 हजार रुपयांमध्ये केली जाणार आहे. अनुभवी नेत्रतज्ज्ञ, व्यक्तिगत मार्गदर्शन व सल्ला, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

जास्तीतजास्त इच्छुक रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन दत्तात्रेय वळसे आय हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आले आहे. नावनोंदणीसाठी रस्ता क्र 42/1,2,3 प्लॉट बी शांता निकेतन कॉलनीसमोर, भाऊ पाटील रोड, पुणे आयटी पार्क जवळ, बोपोडी, पुणे 411020 या ठिकाणी किंवा  020 25828001/2/3/4 या क्रमांकावर संपर्क साधावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.