Wadmukhwadi : दारू पिऊन कार चालकाने दिली दुचाकीला धडक; दोघेजण जखमी

एमपीसी न्यूज : दारू पिऊन कार चालवून मोटरसायकलला (Wadmukhwadi) मागून धक्का देऊन चालकास व त्याच्या पाठीमागे बसलेल्या बहिणीला गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी (दि.10 नोव्हेंबर) वडमुखवाडी येथे घडली.

याबाबत सुरज राऊत (वय 25 वर्षे, रा.  चऱ्होली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात भादवि कलम 279, 337, 338, 427 मोटर व्हेइकल कायदा कलम 185, 184, 134(ब) 119/177 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुण्याकडून आळंदीकडे दारू पिऊन कार चालवत येताना आरोपीने आपली कार (एस एक्स 4 कार नंबर एच एच 12 एच व्ही 9001) समोर चाललेल्या पल्सर मोटरसायकलला (एम एच 14 जी एल 8487) धडक दिल्याने अपघात घडला.

Pune news : लघुउद्योजकांना जिल्हास्तरीय पुरस्काराकरीता 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पल्सरचे चालक हे फिर्यादी असून त्यांच्या उजव्या पायाच्या करंगळी व करंगळी (Wadmukhwadi) शेजारील बोटाला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच, त्यांच्या पाठीमागे बसलेली त्यांची बहीण सुप्रिया राऊत (वय 27 वर्षे) यांच्या पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्यांच्या उजव्या पायास किरकोळ जखम झाली आहे.आरोपी हा दोन्ही वाहनांच्या नुकसानीसाठी कारणीभूत असून त्याने अपघाताच्या ठिकाणाहून पळ काढला. दिघी पोलिस त्याचा तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.