BJP : भाजपतर्फे ‘गाव चलो’ अभियान – मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ‘गाव चलो’ अभियान राबवण्यात (BJP) येत असून या अभियानांतर्गत हवेली तालुक्यातील निरगुडी गावातून सुरुवात केली.

या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक बूथवर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पोहोचणार असून संघटन व्यवस्थापन, लाभार्थी भेटी, समाजातील विविध घटकांशी संवाद साधणार आहे.

मीही पार्टीचा कार्यकर्ता म्हणून निरगुडी गावात हे अभियान राबवत आहे, अशी माहिती माजी महापौर तथा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

Pune : ससून रुग्णालयात लागली आग; अग्निशमन दलाच्या जवानांमुळे धोका टळला

यावेळी निरगुडीचे सरपंच अतुल रोकडे, उपसरपंच सुरेखाताई कदम, (BJP) संदीपअप्पा भोंडवे, अर्जुन जगताप, सुनिल खंडागळे, दिवाणशेठ कदम, सुधीर मगर, भिमाजी कदम, सनी मगर, मंगेश कदम तसेच जय हनुमान मित्र मंडळ आणि रामेश्वर मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.