Wadmukhwadi : कारची दुचाकीला जोरदार धडक, एकाचा मृत्यू एक जण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – भरधाव कारने एका दुचाकीला धडक दिली (Wadmukhwadi)ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात रविवारी (दि.11) वडमुखवाडी येथील लिलाबाई तापकीर चौकाजवळ घडला.

सुनिल दिलीप चौरे (वय 30 रा. पाषाण) यांचा मृत्यू झाला आहे तर अनिल धर्मेंद्र चव्हाण (वय 27 रा. बावधन) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी कालिदास पंढरीनाथ बिरादार (रा. चऱ्होली) या कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे. दिघी पोलीस ठाण्यात गणेश बालाजी शेंडगे (वय 25 रा. पाषाण) यांनी फिर्याद दिली आहे.

Ashok Chavan : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये प्रवेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने त्याच्या ताब्यातील कार(Wadmukhwadi ) बेदरकारपणे चालवून चौरे यांच्या दुचाकीला समोरुन जोरदार धडक दिली. यामध्ये चौरे यांचा मृत्यू झाला तर चव्हाण हे गंभीर जखमी झाल आहेत.यावरून दिघी पोलिसांनी गुन्हा दाखलकेला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.