Ashok Chavan : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये प्रवेश

एमपीसी न्यूज –  काँग्रेसचे दिग्गज नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavan)  यांनी अखेर भाजप पक्षात प्रवेश  केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  चंद्रशेखर बावनकुळे,  आशिष शेलार यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

अशोक चव्हाण यांनी  काल आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती . अखेर आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.यावेळी  बोलताना ते म्हणाले, विकासाला सोबत घेऊन आम्ही एकत्र काम करत आहोत. देवेंद्र फडणवीस नेहमी सकारात्मक राहिले, आम्हाला साथ दिली. मी प्रामाणिकपणे भाजपमध्ये काम करेन. राज्यात भाजपला कशा अधिक जागा मिळतील यासाठी काम करू.

Dehugaon : योगाभ्यासातून बुद्धिमत्ता वाढू शकते – डॉ. विश्वास मंडलीक

विरोधात आणि सत्तेत असताना देखील आमचे राजकारणापलीकडे सबंध होते. विकासाची राज्यासाठी काम करताना आम्ही नेहमीच एकमेकांना साथ दिलीय. गेल्या 38 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनंतर आज मी नवी सुरूवात करतोय, असे  चव्हाण म्हणाले.

तसेच ,मी कधीही कुणावर व्यक्तिगत टीका केली नाही आणि करणार नाही. सभागृहात विरोधी भूमिका मी प्रमाणिकपणे केली. सभागृहाच्या बाहेर मात्र एकमेकांशी सबंध होते ती एक परंपरा आहे.

पक्ष जे आदेश देतील ते मला मान्य असतील. जे मला सांगितले जाईल त्यानुसार मी काम करीन. हा माझा व्यक्तिगत निर्णय होता मला कुणी जा असे सांगितले नाही. मी अधिक भाष्य करणार नाही, योग्य वेळी बोलीन, असे अशोक चव्हाण ( Ashok Chavan)  म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.