Wakad : थेरगामध्ये आढळला 5 वर्षाच्या मुलाचा कुजलेला मृतदेह

एमपीसी न्यूज – थेरगाव येथे एका 4 ते 5 वर्षाच्या मुलाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. हा प्रकार आज (शुक्रवारी) सायंकाळी सातच्या सुमारास उघडकीस आला.

मृतदेह आढळलेल्या मुलाचे हात आणि पाय तोडलेल्या अवस्थेत आहेत. तर अन्य शरीर कुजलेले आहे. त्यामुळे त्याची ओळख पटविणे पोलिसांपुढे आव्हान आहे. मुलाचा मृत्यू मागील 4 ते पाच दिवसांपूर्वी झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी नियंत्रण कक्षातून थेरगाव येथील संतोष मंगल कार्यालयाच्या शेजारी एका 4 ते 5 वर्षाच्या मुलाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. मुलाची ओळख पाठविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. हा घातपाताचा प्रकार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.