Dighi : जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – जुन्या भांडण्याच्या रागातून चौघांनी मिळून एका तरुणावर कोयत्याने वार केले.मारहाण करत कोयत्याने वार करण्यात आले आहेत. ही घटना बुधवारी (दि.5) रात्री सव्वा अकरा वाजता घडली.

विशाल दत्तात्रय दौंडकर (वय-21 रा. चिंबळी, खेड) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अविनाश धनवे, वसीम शेख, मुन्ना शेख, बाल्या वाळुंज सर्व राहणार आळंदी यांच्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल हे आळंदी येथे वेताळ बाबा यांना भेटायला गेले असताना आरोपी तेथे आले व त्यांनी विशाल यांना जुन्या भांडणाच्या रागातून शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादीने त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला असता अविनाश धवने याने हातातील कोयत्याने विशाल यांच्या डाव्या डोळ्यावर वार केले. यामध्ये विशाल गंभीर जखमी झाले. दरम्यान आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. पळून जात असताना आरोपी शेख याने विशाल यांच्या खिशातून मोबाईल फोन व 15 हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.