Wakad Crime : इमारतीवरून पडल्याने मुलीचा मृत्यू; एक मुलगी गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – इमारतीवरून पडल्याने एका मुलीचा मृत्यू झाला. तर दुसरी मुलगी गंभीररित्या जखमी झाली. ही घटना सोमवारी (दि. 16) नढेनगर, काळेवाडी येथे घडली आहे.

नंदीनी अनिल म्हेत्रे (वय 12) असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. तर धनश्री कदम (वय 12, दोघीही रा. नढेनगर, काळेवाडी) असे जखमी मुलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास नंदिनी आणि धनश्री या दोन्ही मैत्रीणी नढेनगर, काळेवाडी येथील गणेश वंदना इमारतीच्या टेरेसवर खेळत होत्या. इमारतीच्या डक्‍टवर ठेवलेल्या प्लायवुडवर त्या बसलेल्या असताना प्लायवुड तुटल्याने त्या दोघी खाली पडल्या. त्यापैकी नंदीनी हिचा जागीच मृत्यू झाला. तर धनश्री ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर आकुर्डी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.