Wakad Crime News : खुनी हल्ला प्रकरणातील दुसऱ्याही महिलेचा मृत्यू; 12 दिवसानंतरही पोलिसांना धागेदोरे लागेनात

एमपीसी न्यूज – झोपेत असलेल्या महिलेच्या डोक्यात कठीण वस्तूने मारून तिचा खून केल्याची घटना 16 ऑक्टोबर रोजी पहाटे काळेवाडी येथे घडली. तसेच या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या महिलेचाही काल (मंगळवारी) उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मंगल साहेबराव सत्वधर (वय 48) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. छाया पांडुरंग गुंजाळ (वय 50) असे यापूर्वी मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

15 ऑक्टोबर रोजी रात्री मयत छाया, विहिण मंगल, पती पांडुरंग आणि सासू सुंदराबाई भानुदास गुंजाळ हे चारजण घराच्या हॉलमध्ये झोपले होते. सासू सुंदराबाई या भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यामुळे 16 ऑक्टोबर रोजी पहाटे चार वाजताच्या सुमारास सुंदराबाई घराचा दरवाजा अर्धवट उघडा ठेऊन नेहमीप्रमाणे भाजी विक्रीसाठी निघून गेल्या.

अर्धवट उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून अज्ञात व्यक्तीने छाया यांना कठीण वस्तूने मारहाण करून त्यांचा खून केला. तर छाया यांच्या शेजारी झोपलेल्या मंगल यांना देखील ठार मारण्याच्या उद्देशाने मारून गंभीररीत्या जखमी केले. 10 दिवसानंतर मंगल यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली.

घटनेला 12 दिवस उलटून गेले आहेत. अजूनही पोलिसांना हल्लेखोरांचा थांगपत्ता लागलेला नाही. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.