Wakad : पूर्ववैमनस्यातून दोघांना टोळक्याकडून कोयता व सिमेंटच्या गट्टूने मारहाण

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाचा राग मनात धरून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने (Wakad) दोघांना लाथाबुक्क्या तसेच कोयता व सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली आहे. हा प्रकार वाकड येथील दत्तमंदिर रोड येथे शुक्रवारी (दि.2) रात्री घडला.

याप्रकरणी महेश गंगाधर साळवे (वय 24 रा. वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी ओमकार विलास डोलारे (वय 22 रा.वाकड) याला अटक केली असून आप्पा पवार (वय 25), पिराजी खणकारे (वय 23), अजिंक्य उर्फ भाव्या सपकाळ (वय 21) व सागर घडसिंग (वय 25) सर्व रा. वाक़ड व त्यांचे दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याला रयतेचे राज्य म्हणून ओळख दिली-शरद पवार 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र युवराज मल्हारी साळवे हे रोडवरून पायी जात असताना आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून युवराजकडे बोट दाखवत हाच तो म्हणत इशारा केला. यावेळी आरोपींनी लाथा बुक्यांनी युवराजला मारहाण करण्य़ास सुरुवात केली. यावेळी फिर्यादींनी मध्यस्थी केली असता , दोघानांही सिमेंटच्या गट्टूने व कोयत्याने डोक्यात मारत गंभीर जखमी केले.

यावेळी आप्पा पवार याने हातातील कोयता हवेत फिरवत आम्ही या भागातले डॉन आहोत अशी धमकी दिली. यामुळे जमलेले नागरिक तेथून पळून गेले तर दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली. यावेळी आरोपींनी फिर्यादीच्या खिशातील 1 हजार 800 रुपये काढून घेतले. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील (Wakad)  तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.