Wakad : विवाहितेच्या छळ प्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल

हा प्रकार 22 फेब्रुवारी 2016 पासून 13 जानेवारी 2019 या कालावधीत सनशाईन नगर, काळेवाडी येथे घडला. : Five in-laws charged in marital harassment case

एमपीसी न्यूज – माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याबाबत सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 22 फेब्रुवारी 2016 पासून 13 जानेवारी 2019 या कालावधीत सनशाईन नगर, काळेवाडी येथे घडला.

याप्रकरणी पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. पती अजय शंकरराव रापतवार (वय 35), सासरे शंकरराव किशनराव रापतवार, सासू अरुणा शंकरराव रापतवार, अक्षदा शंकरराव रापतवार, अभय शंकरराव रापतवार (सर्व रा. सनशाईन नगर, काळेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून काहीही कारण नसताना विवाहितेसोबत वारंवार भांडण केले. तसेच माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली.

यावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास दिला.

याबाबत विवाहितेने नांदेड जिल्ह्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 9 जुलै 2020 रोजी पती, सासू, सासरे, नणंद आणि दीर यांच्या विरोधात फिर्याद दिली.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून गुरुवारी (दि. 13) वाकड पोलीस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आला.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.