Wakad furniture fraud : फर्निचरची मोठी ऑर्डर मिळवून देण्याच्या बहाण्याने व्यावसायिक महिलेची फसवणूक

एमपीसी न्यूज : मोठ्या कंपनीमधील फर्निचरची 50 ते 60 लाख रुपयांची ऑर्डर मिळवून देण्याच्या बहाण्याने एका व्यावसायिक महिलेची एक लाख रुपायांची फसवणूक करण्यात आली आहे.(Wakad furniture fraud) ही फसवणूक 17 डिसेंबर 2020 रोजी वाकड येथे घडली.

याप्रकरणी तक्रारदार महिलेने गुरुवारी (दि.16) दुसऱ्या महिलेविरोधात वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपी महिलेने फोन करून सांगितले की, ती एका मोठ्या कंपनीत डबा पुरवण्याचे काम करते. तेथे ओळख असून त्याच ओळखीतून मी तुम्हाला 50 ते 60 लाखांचे फर्निचरचे काम मिळवून देते असे आमिष दाखवले.

Disable students felicitation : पंचायत समितीमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

मात्र त्यासाठी एक लाख रुपये द्यावे लागतील. फिर्यादी यांच्याकडे एवढी रक्कम नव्हती. तरी त्यांनी त्यांच्या वडिलांच्या बँक खात्यावरून आरोपी महिलेच्या बँक खात्यात 1 लाख रुपये 17 डिसेंबर 2020 रोजी पाठवले.(Wakad furniture fraud) तरी आज अखेर फिर्यादी यांना कोणतीही ऑर्डर न देता तसेच घेतलेले पैसे ही न परत करता त्यांची फसवणूक केली. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.