Disable students felicitation : पंचायत समितीमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

एमपीसी न्युज : जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था पुणे व पंचायत समिती मावळ समग्र शिक्षा अभियान समावेशित शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती मावळ येथील शिक्षण विभागात इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षा उत्तीर्ण विशेष गरजा धारक (Disable students felicitation) दिव्यांग विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. गुरुवारी (दि 15) झालेल्या या सोहळ्यात 16 विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

विशेष गरजा धारक दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी,कौतुक करण्यासाठी, प्रेरणा देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला.इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण विशेष गरजा धारक 16 विद्यार्थ्यांचा गौरवचिन्ह (ट्रॉफी) व पुष्प देऊन गुणगौरव करण्यात आला. पंचायत समिती मावळचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत,गट शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता कृष्णा फडतरे, वडगाव नगरपंचायतचे माजी नगरसेवक भूषण मुथा, पंचायत समिती मावळचे शिक्षण अधिकारी सुदाम वाळूंज,मनोहर कुलकर्णी,सुजाता शिंदे, सांगिसे केंद्राचे केंद्रप्रमुख सुहास धस, टाकवे केंद्राचे केंद्रप्रमुख जरग सर या मान्यवरांच्या हस्ते विदयार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

उपस्थित मान्यवरांनी 10 वी 12 वी परीक्षा उत्तीर्ण विदयार्थाचे कौतुक करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या डॉ.शोभा खंदारे,अधिव्याखाता श्रीकृष्णा फडतरे,गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांच्या कार्य प्रेरणेतून हा कार्यक्रम घेण्यात आला.(Disable students felicitation) सदर कार्यक्रम वडगाव नगरपंचायतचे माजी नगरसेवक भूषण मुथा यांच्या सौजन्याने घेण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना गौरव चिन्ह (ट्रॉफी ) प्रदान करण्यात आले.

Talegaon Dabhade : विद्यार्थ्यांना घडवून समाजाला चांगला नागरिक देण्याचे काम शिक्षक करतात – वैशाली दाभाडे

कार्यक्रमाचे नियोजन विशेष साधनव्यक्ती शितल शिशुपाल, विशेष शिक्षिका स्मिता काळे, साधना काळे,लता वनवे,शकीला शेख यांनी केले.कार्यक्रमास समग्र शिक्षा अभियान मधील विषय साधन व्यक्ती , MSI कॉर्डिनेटर, डाटा एन्ट्री ऑपरेटर इत्यादी उपस्थित होते. स्वागत विशेष शिक्षिका साधना काळे यांनी केले.(Disable students felicitation) कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशेष साधन व्यक्ती शितल शिशुपाल यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षिका लता वनवे व स्मिता जगताप यांनी केले.आभार प्रदर्शन विशेष शिक्षिका साधना काळे यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.