Talegaon Dabhade : विद्यार्थ्यांना घडवून समाजाला चांगला नागरिक देण्याचे काम शिक्षक करतात – वैशाली दाभाडे

एमपीसी न्युज : कुंभार जसे मातीच्या गोळ्याला आकार देऊन घडवीत असतात, त्याच पध्द्तीने शिक्षक कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक असे संस्कार करून विद्यार्थ्यांना घडवितात.(Talegaon-Dabhade) त्यातून एक चांगला नागरिक समाजाला देण्याचे काम शिक्षक करत असतात, असे गौरवोद्गार इंनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी काढले.

शिक्षक दिना निमित्त कार्यगौरव पुरस्कार व आरोग्य शिबीराचे इनरव्हील क्लब तर्फे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी दाभाडे बोलत होत्या. यावेळी माजी अध्यक्षा मीराताई बेडेकर,(Talegaon-Dabhade) ज्योती पाटील,अर्चना पिंपळखरे व क्लबच्या इतर सदस्या उपस्थित होत्या. गुरूवार दि 15 सप्टेंबर रोजी ओम साई आयुर्वेदा येथे नगरपालिका माध्यमिक शाळा क्र 2 व शाळा क्र 6 येथील मुख्याध्यापकांसह शिक्षकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

Pimpri gang attack : पिंपरी मार्केटमध्ये भरदिवसा एकावर कोयत्याने वार करत टोळक्याचा राडा

प्रोजेक्ट चेअरमन डॉ लता पुणे यांनी आरोग्य विषयी मार्गदर्शन केले. तसेच गेली कित्येक वर्षे शाळा क्र 2 व 6 चा दहावीचा निकाल सतत 100 % लावणाऱ्या शाळा क्र 2 च्या मुख्याध्यापिका वर्षा थोरात व शाळा क्र 6 चे मुख्याध्यापक अमोल पाटील,शिक्षिका दीपमाला गायकवाड, वसुंधरा माळवदकर, (Talegaon-Dabhade)प्रतिभा काळे,प्रियांका हातेकर,आशा खुणे,नगरपरिषद माध्यमिक विद्यालय क्रमांक 2 च्या शिक्षिका योगिता राजेंद्र शिंदे, शितल अविनाश रासकर, सुधीर सोपान बसवंते, शिक्षकेतर कर्मचारी सुप्रिया वाव्हाळ,शंकर तोळे यांचा ट्रॉफी व तुळसीचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या सचिव निशा पवार यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.