Pimpri gang attack : पिंपरी मार्केटमध्ये भरदिवसा एकावर कोयत्याने वार करत टोळक्याचा राडा

एमपीसी न्यूज : पिंपरी येथील गुरुनानक मार्केटमध्ये एका तरुणावर तीन ते चार जणाच्या टोळक्याने कोयत्याने वार करत परिसरात गोंधल घालत दहशत पसरवली.(Pimpri gang attack) ही घटना बुधवारी (दि.14) दुपारी अडीचच्या सुमारास घडली.

याप्रकरणी विकास बिहारी राम (वय 21 रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पी.डी. उर्फ प्रेम डोंगरे (वय18 पत्ता माहिती नाही) व त्याचे दोन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गुरुनानक मार्केट मधील एका चप्पलच्या दुकानात काम करतात. बुधवारी ग्राहकासाठी गोडाऊनमधून चप्पल आणत असताना फिर्यादी यांच्या तोंड ओळखीचा इसम प्रेम डोंगरे हा त्याच्या साथीदाराबोत तेथे आला.(Pimpri gang attack) त्याने फिर्यादीला अडवून जुन्या भांडणाच्या रागातून फिर्यादीच्या डोक्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र फिर्यादी यांनी तो चुकवला असता त्यांच्या डोक्याला कोयता घासला.

Pune heavy rain : मुळशी व पवना धरणातून विसर्ग वाढवला

त्यानंतर आरोपींनी तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला मात्र फिर्यादीने दोनवेळा तो ही वार चुकवला. यावेळी कोणी आडवे आले तर त्याला आडवा करेन अशी धमकी देत आरोपींनी परिसरातील गाड्यांवरही तलवार व कोयत्याने मारून गाड्यांचे नुकसान केले.(Pimpri gang attack) परिसरात गोंधळ घालून दहशत पसरवली. यावेळी परिसरातील दुकानदारांनी भितीने दुकानांचे शटरबंद करून घतले होते. यावेळी हातत कोयता व तलवार फिरवून आरडा-ओरड करत तेथून ते निघून गेले. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.