Sexual abuse case : ब्लॅकमेल करून महिलेवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज : महिलेला इमोशनल ब्लॅकमेल करून महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केला.(Sexual abuse case) हा प्रकार मार्च 2020 ते 16 सप्टेंबर 2022 या कालावधीत खडी मशीन रोड, दिघी येथे घडली.

आकाश अनिल मिसाळ (वय 22, रा. धावडेवस्ती, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri gang attack : पिंपरी मार्केटमध्ये भरदिवसा एकावर कोयत्याने वार करत टोळक्याचा राडा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांची दररोज होणाऱ्या भेटीतून ओळख झाली. त्यानंतर आरोपीने महिलेला इमोशनल ब्लॅकमेल करून तिचा वारंवार पाठलाग केला.(Sexual abuse case) महिलेची मैत्री करून त्यांना खडी मशीन रोडवरील एका लॉजवर नेले आणि जबरदस्तीने त्यांच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार कुणाला सांगितला तर फिर्यादी महिला आणि तिच्या घरच्यांना जगू देणार नाही, असे म्हणत हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.