Pune heavy rain : मुळशी व पवना धरणातून विसर्ग वाढवला

एमपीसी न्यूज : संततधार पावसामुळे मुळशी व पवना धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे.त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील मुळा व पवना नदीकिनारी (Pune heavy rain) राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्यातचे निर्देश किरण गावडे, मुख्यय अग्निशमन अधिकार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांनी दिले आहेत.

आज दुपारी 2 वा मुळशी धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग 21,120 वरून वाढवून 26,400 क्युसेक करण्यात आला. आवश्यकता असल्यास विसर्ग वाढवून 30,000 ते 35,000 क्युसेक पर्यंत वाढविण्यात येईल. असे बसवराज मुन्नोळी, हेड डान्स इस्टेट अँड ऍडव्होकसी, टाटा पॉवर यांनी सांगितले आहे.

mulshi dam

तर पवना धरणाच्या पाणलाेट क्षेत्रात पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे पवना धरणाच्या सांडव्याद्वारे आज दुपारी 3.00 वा 6400 क्युसेक वाढवुन 8600 क्युसेस व पावर आऊटलेट 1400 असे एकुण 10,000 क्युसेक करण्यात आला. त्यामुळे नदी तिरा कडील गावातील रहिवाशानी सतर्क रहावे.(Pune heavy rain) यामुळे गावडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओम प्रकाश बहिवाल, टेलिकॉम अधिकारी थॉमस नरोना हे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी आज दुपारपासून मुळा व पवना नदी किनारी असलेल्या भागांची पाहणी करत आहेत. त्यांनी दापोडी सांगवी पिंपरी व चिंचवड भागाची आतापर्यंत पाहणी पूर्ण केली आहे.

Wakad fraud : पुर्ण पैसे घेऊनही फ्लॅटचे सेलडीड करून न देणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल

गावडे म्हणाले की,  मुळशी धरणातून विसर्ग केलेले पाणी मुळा नदीतून पुढे वाहत चालले आहे. तसेच पवना धरणातून विसर्ग केलेले पाणी पवना नदीतून पुढे जात आहे.(Pune heavy rain)त्यामुळे या दोन्ही नद्यांचे पाणी त्यांच्या नदी किनाऱ्यावरील भागांमध्ये शिरले नाही. नद्यांमध्ये पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांनी नदी पत्रात जाऊ नये. नदीजवळ राहणाऱ्या लोकांनी सावध रहावे. ते पुढे म्हणाले की, धरणातून विसर्ग वाढला, शहरात पाऊस वाढला व नदीतून पाणी वाहणे थांबले तर पुराचे पाणी आजबाजूच्या लोकोवस्तीत शिरू शकते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.