Wakad fraud : पूर्ण पैसे घेऊनही फ्लॅटचे सेलडीड करून न देणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : फ्लॅट विक्री करत असताना संपूर्ण पैसे घेऊनही केवळ सेल अग्रीमेंट करून सेलडीड न करून देता ग्राहकांची फसणूक केल्या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.(Wakad fraud) हा प्रकार 26 मार्च 2021 ते 15 सप्टेंबर 2022 या कालावधीत घडला आहे. महिला आरोपी विरोधात वाकड पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि.15) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MP Shrirang Barne : खासदार श्रीरंग बारणे यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती

पोलिसांनी देलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपी महिलेकडून डांगे चौक येथील साई कृष्ण पार्क येथील द्वारका पार्क सोसायटीमध्ये 28 लाख 50 हजार रुपयांना फ्लॅट विकत घेतला होता.(Wakad fraud) त्याचे पूर्ण पैसे पाठवूनही आरोपी महिलेने केवळ फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन करून अग्रीमेंट टू सेल करून दिले मात्र आज अखेर सेलडीड प्रमाणपत्र न देता फिर्यादी महिलेचा फसवणूक केली आहे. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.