Wakad news : प्राधिकरणाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम; दोघांवर गुन्हा दाखल

प्राधिकरणाकडून संबंधितांना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्यांनी त्यांचे अनधिकृत बांधकाम काढून घेतले नाही.

एमपीसीन्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरिभाऊ गणपत भिगवणकर, गणेश हरिभाऊ भिगवणकर (रा. कैलास नगर, थेरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे उप अभियंता व्ही. डी. नाईक यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची थेरगाव येथील कैलास नगरमध्ये पेठ क्रमांक 36 येथे जागा आहे. त्या जागेवर आरोपींनी बेकायदेशीरपणे अनधिकृत बांधकाम केले आहे.

याबाबत प्राधिकरणाकडून संबंधितांना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्यांनी त्यांचे अनधिकृत बांधकाम काढून घेतले नाही.

त्यामुळे प्राधिकरणाकडून दोघांवर एमआरटीपी कलम 53 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.