Pimpri corona Update : शहरात आज 1259 नवीन रुग्णांची नोंद, 502 जणांना डिस्चार्ज, 10 मृत्यू

शहरात आजपर्यंत 58 हजार 747 जणांना कोरोनाची लागण झाली.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 1240 आणि महापालिका हद्दीबाहेरील 19 अशा 1259 नवीन रुग्णांची आज (बुधवारी) भर पडली. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 58 हजार 747 वर पोहोचली आहे. शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 502 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 7 आणि पालिका हद्दीबाहेरील 3 अशा 10 जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामध्ये चिखली, काळेवाडी, भोसरी, चिंचवड, थेरगाव, वाल्हेकरवाडी, भवानी पेठ, खेड येथील रुग्णांचा मृत्यू झाला.

शहरात आजपर्यंत 58 हजार 747 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 45 हजार 212 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 966 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 239 अशा 1205 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या 6081 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.