Wakad : ताथवडे सिलेंडर स्फोट प्रकरण; टँकर चालकासह चौघांना अटक

एमपीसी न्यूज – ताथवडे येथील गॅस स्फोट प्रकरणातील टँकर चालकासह(Wakad) चौघांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी (दि. 11) माण येथे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात अटक आरोपींची संख्या सात झाली आहे.

टँकर चालक मोहमद रशीद नसीम (वय 34, रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश), मुकेश बद्रीराम देवासी (वय 26), प्रेमाराम सियाराम मेघवाल (वय 49), गोवर्धन भीमसेन राजपूत (वय 28, सर्व रा. ताथवडे, मूळ रा. पाली, राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी यापूर्वी महिपाल चौधरी (रा. पुनावळे), राहुल कुमार राज देवराम (रा. थेरगाव) आणि चंद्रकांत महादेव सपकाळ (रा. ताथवडे) यांना अटक केली आहे.

Chinchwad : करोडपती पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांची उपायुक्तांकडून चौकशी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी (Wakad)आपसात संगनमत करून रविवारी (दि. 8) रात्री ताथवडे येथे टँकरमधून अवैधरित्या गॅस काढत होते. त्यावेळी आग लागल्याने मोठे स्फोट झाले. दरम्यान, वाकड पोलिसांनी घटनेनंतर 24 तासाच्या आत जागमालकासह तिघांना अटक केली. त्यानंतर मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या टँकर चलकासह चौघांना बुधवारी अटक करण्यात आली आहे.

गुन्ह्यातील टँकर शिक्रापूर येथील बीपीसीएल यार्डमध्ये हलवण्यात आला आहे. तसेच, जळालेली अन्य वाहने देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार टँकर बाबतीत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.